महिलेच्या खून प्रकरणी आरोपीला जन्मठेप; पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या तपासाला यश

शिर्डी : विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवून तिचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्या आरोपीस राहता येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाच्या तपासात तत्कालीन पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी केलेल्या सक्षम तपासामुळे आरोपीला शिक्षा होण्यास महत्त्वाची मदत झाली.दि. १६ जुलै २०२३ रोजी राहता तालुक्यातील सावळीविहीर येथील आरोपी अजय राजेंद्र म्हस्के याने विवाहित महिला सौ. सविता सुनील बतीसे हिच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले होते. त्यानंतर दोघेही एकत्र राहत होते. मात्र आरोपी दुसरे लग्न करणार असल्याच्या संशयातून त्यांच्यात वारंवार वाद होत होते. याच रागातून आरोपीने महिलेवर धारदार चाकूने गळ्यावर वार करून तिचा खून केला होता.या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ, सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील, पोहेकॉ संदीप गडाख व पोलिस कर्मचारी कैलास राठोड यांनीही तपासात सहभाग घेतला.सदर प्रकरणात राहता येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश एस. गुप्ता यांनी आरोपी अजय म्हस्के यास दोषी ठरवत जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. डी. जी. पानगव्हाणे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *