राहुरी वेब प्रतिनिधी,७ मार्च २६ (शरद पाचारणे) :
राहुरी तालुक्यातील गुहा येथे श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रामहोत्सव २०२६ निमित्त रविवारी (दि. ८) सकाळी १० वाजता भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने विविध पक्षांचे नेते एकाच मंचावर येणार असल्याने परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.या महाआरतीस भाजपचे युवा नेते अक्षयदादा कर्डिले, शिवसेनेचे नेते सागरभैय्या बेग तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते व आमदार प्राजक्तदादा तनपुरे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षांशी संबंधित असलेले हे नेते महाआरतीच्या निमित्ताने एकत्र येणार असल्याने या कार्यक्रमाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.दरम्यान, आमदार प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलेले असतानाच या महाआरतीच्या निमित्ताने कर्डिले, बेग आणि तनपुरे हे तिन्ही नेते एकाच मंचावर येणार असल्याने परिसरात राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, गुहा यांच्या वतीने सर्व नाथभक्तांनी यात्रामहोत्सवात सहभागी होऊन चैतन्य श्री कानिफनाथ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.