दिव्यांग बांधवांसाठी दिवाळी फराळ वाटप; मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद;प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचा सामाजिक उपक्रम; कृपा वृद्धाश्रमातील ज्येष्ठांनाही फराळाचे वाटप

राहुरी प्रतिनिधी शरद पाचारणे  : दिवाळीचा आनंद समाजातील गरजू आणि दिव्यांग बांधवांसोबत साजरा करण्याच्या उद्देशाने प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था यांच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी दिवाळी फराळ वाटप व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुरी नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविकात मधुकर घाडगे यांनी सांगितले की, प्रहार दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या प्रेरणेतून दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो. दिवाळी फराळ वाटप हे केवळ निमित्त असून, या माध्यमातून राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील दिव्यांग बांधव एकत्र येतात. त्यांच्या समस्या, अडचणी आणि प्रश्नांवर चर्चा होऊन विचारांची देवाणघेवाण होते. दिव्यांग बांधवांच्या सहभागातून आणि सहकार्यातूनच असे सामाजिक उपक्रम यशस्वी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी तांदूळवाडी येथील कृपा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनाही दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश जगधने, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष दगडू जाधव, दादासाहेब मोरे, म्हाळू पाचारणे, हमीदभाई शेख, लक्ष्मीताई देशमुख, कवी बाळासाहेब मंतोडे, राजेंद्र पोकळे, श्रीकांत साळुंखे, कुंडलिक खपके पाटील, तुकाराम बाचकर, दीपक जाधव, जुबेर मूसानी, भरत आढाव, रवींद्र भुजाडी, दत्तात्रय खेमनर, राजेंद्र घनवट, सुरेश दानवे, भास्कर दरंदले, बाळासाहेब गांडळ, वेणूनाथ आहेर, अल्ताफ शेख, अनामिका हारेल आदींसह संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांनी मांडली. प्रास्ताविक मधुकर घाडगे यांनी केले, तर उपस्थित दिव्यांग बांधवांचे आभार तालुका सचिव रवींद्र भुजाडी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *