राहुरी तालुका FPC चा उपक्रम; प्रत्येक शेअरधारकाला पाच लिटर जीवामृताचे वितरण, सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले
पिंपरी अवघड : शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे प्रोत्साहित करण्याबरोबरच शेतीचा उत्पादन खर्च कमी करून जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या उद्देशाने वैशाली ढसाळ यांच्या पुढाकारातून राहुरी तालुका FPC च्या वतीने पिंपरी अवघड येथे सोमवारी (दि. १६) शेअरधारकांना मोफत जीवामृताचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात प्रत्येक शेअरधारकाला पाच लिटर याप्रमाणे जीवामृत वितरित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली ढसाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी उपस्थित शेतकरी व महिलांना जीवामृताचा वापर, त्याचे फायदे, जमिनीची सुपीकता वाढविण्यातील त्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गहू व मका पेरणीचे नियोजन आणि पीक व्यवस्थापनाबाबतही माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला CMRC अध्यक्षा पुष्पाताई धनवटे, सहयोगिनी वैशाली ढसाळ, FPC संचालक पुष्पा लांबे, परिवर्तक भागीदार स्वाती गाडे, देहात कॉमचे विशाल सोनवणे, सोहेल पठाण यांच्यासह गटातील महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची माहिती CMRC LDC अक्षय थोरात यांनी दिली.