पत्त्याच्या क्लबवर तोफखाना पोलिसांचा छापा; ७३ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर : कृष्णधाम रोडलगत ओढ्याशेजारील अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या आडोशाला तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकला. या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ७३ हजार ४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिनांक २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४० वाजता गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांना कृष्णधाम रोड परिसरात काही इसम गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी छापा टाकला.
या कारवाईत गणेश जालिंदर गायकवाड (३३), सुनील अशोक मांजरे (३८), हिरामन राजेंद्र पवार (२६), कुंडलीक दत्तात्रय गायकवाड (३९), विशाल सोमनाथ पवार (२८), राजू मोतीराम शिंदे (४०), अंकुश भीमराज मांजरे (३६) आणि संतोष पोपट गायकवाड (४०) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ७३,४३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश साहेबराव त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२३/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश शिंदे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे, भानुदास खेडकर, अब्दुलकादर इनामदार, सूरज वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी, अविनाश बर्डे, सतीश त्रिभुवन, सुजय हिवाळे, बाळासाहेब भायसे, भागवत बांगर, शाकीर सय्यद, कपिल गायकवाड, सतीश शिंदे, महिला पोलीस नाईक जिजा खुडे आणि कल्पना अवसरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *