डराडोच्या माध्यमातून राजुरीत वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

फलटण, ता. १ जून : डराडो (इन्स्टिट्यूट असोसिएशन ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने कै. ॲड. धोंडीराम अर्जुना खरात (सर) यांच्या ७६ व्या जयंतीनिमित्त राजुरी येथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

राजुरी येथील खाजगी जागेत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या विश्वस्त ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास जागा मालक भैय्यासाहेब रणदिवे, राजुरी येथील ग्रामस्थ सौ. रूपाली रणदिवे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेत कै. ॲड. धोंडीराम खरात यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *