राहुरी रेल्वे स्थानकावर पुणे–शिर्डी एक्सप्रेसचे भव्य स्वागत

राहुरी वेब प्रतिनिधी शरद पाचारणे –  नव्याने सुरू झालेल्या पुणे–शिर्डी एक्सप्रेस रेल्वे गाडीचे राहुरी रेल्वे स्थानकावर मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रवासी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्वागत सोहळ्यास माजी खासदार प्रसादराव तनपुरे, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पेरणे, सचिव मंगल जैन, रेल्वे सल्लागार समिती सदस्य प्रभाकर धसाळ, माजी उपसरपंच इंद्रभान पेरणे, गोरक्षनाथ खडके, ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद, मुख्याध्यापक सर्जेराव पेरणे, कानिफनाथ धसाळ, हभप महेश महाराज खाटेकर, संतोष पवार, भैय्यासाहेब आढाव, गणपत पेरणे, सुखदेव खाटेकर, शिवाजी खडके, अविनाश पेरणे, साहेबराव म्हसे, सुनील हिवाळे, रावसाहेब खडके, उपसरपंच ज्ञानेश्वर खिलारे, ईश्वर खिलारे, रवींद्र पेरणे, उमेश पेरणे, नंदू पेरणे, अभिजित खडके, गाहिनीनाथ पेरणे, अशोक तोडमल, शंकर लष्करे, कासिम शेख, नितीन मकासरे, प्रवीण जाधव, सिद्धार्थ पेरणे, स्वप्निल धसाळ, बादल शिंदे, आप्पा लोखंडे, काशिनाथ धागुडे, प्रमोद खडके, रेवन्नाथ धसाळ, मच्छिंद्र लोखंडे, रमेश लोखंडे, अजय कन्नाके, पत्रकार विनीत धसाळ आणि उत्तम बनसोडे आदी उपस्थित होते.

यावेळी पुणे–शिर्डी एक्सप्रेसचे लोको पायलट प्रेम प्रकाश, सह लोको पायलट सवाई सुरज तसेच परिवहन निरीक्षक अनिल अमुले यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी रेल्वे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत या रेल्वे सेवेबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या वतीने सी.सी.एस. एस.ए. बेलपवार, मुख्य तिकीट निरीक्षक एच.आर. कुलथे, स्टेशन प्रबंधक जितेंद्र मीना, डी.एस. वाळके आणि हेमराज ठाकूर हे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी प्रवाशांना नव्या रेल्वे सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

पुणे–शिर्डी एक्सप्रेसच्या प्रारंभामुळे पुणे, राहुरी आणि शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. विशेषतः शिर्डी येथे दर्शनासाठी जाणारे भाविक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग आणि व्यावसायिकांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे. रेल्वे गाडीच्या स्वागतासाठी स्थानकावर जमलेल्या नागरिकांनी आनंद व्यक्त करत रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. या भव्य स्वागत सोहळ्यामुळे राहुरी रेल्वे स्थानक परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *